मुंबई,दि.16: शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले मुस्लीम समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. विविध समाजाचे मेळावे घेतले जात आहेत. उध्दव ठाकरेंनी मुस्लीम समुदायाला एकत्र येत साथ देण्याचं आवाहन केले आहे.
दादरच्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम समुदायातील लोकांसोबत संवाद साधला. यावेळी देशाचं संविधान वाचवण्यासाठी आधी जे झालं ते विसरा, आपल्याला एकत्र यायला हवं अशी साद उद्धव ठाकरेंनीमुस्लीम समाजाला घातली. माहिममधील मुस्लीम समुदायातील लोकांसोबत ठाकरेंनी बैठक घेतली.
मुस्लीम समाजातील लोकांनी या बैठकीनंतर म्हटलं की, उद्धव ठाकरेंशी संवाद साधून चांगले वाटले. प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची भाषा त्यांनी केली. देशाचे संविधान वाचवण्याचं ते बोलले. कोणाविषयी त्यांनी वाईट म्हटलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आधी जे काही झालं ते विसरा, आज आपल्याला एकत्र यायला हवं. संविधानाला वाचवायचं आहे. यानंतर निवडणूक होईल की नाही अशी शंका उद्धव ठाकरेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं सांगितले.
महाराष्ट्रातील मुस्लिम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे. मुस्लिम हा कृतघ्न समाज नाही. ठाकरे यांच्या प्रत्येक उपकाराची परतफेड मुसलमान करतील. आम्ही मुस्लिम बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ. ओवेसींच्या पतंगाचा धागा मुस्लिम नाही. ओवेसी भाजपची बी टीम आहे.
उद्धव ठाकरेंनी चांगले काम केलेय. देशासाठी अनेकांनी बलिदान दिलंय म्हणून देशाला वाचवायचं आहे. उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. बटण कुणाचेही दाबा जिंकणार उद्धव ठाकरेच असंही या लोकांनी सांगितले. तसेच जे देशासाठी चांगले आहे, त्यांना आम्ही साथ देऊ. आमचं कुणाशी शत्रुत्व नाही. पुढील काळात देशासाठी जे चांगले होणार आहे त्यासाठी आम्ही साथ देणार आहोत.