Uddhav Thackeray Dasara Melava: शिवरायांच्या साक्षीने आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो _ _ उध्दव ठाकरे

0

मुंबई,दि.5: Uddhav Thackeray Dasara Melava: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. अमित शाह यांच्या बरोबर अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री व अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री असेच ठरले होते, भाजपाने पाठीत खंजीर खुपसला हे मी शिवरायांच्या साक्षीने आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेतून गद्दारींनी केली, मंत्रीपद काही वेळेपुरतंच आहे, पण गद्दार हा शिक्का कायमस्वरुपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता, आता तो 50 खोक्यांचा बकासूर झाला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला, मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडीसोबत गेलो. त्यावेळी आताचे सर्व लोक सोबत होते. अमित शाह बोलले की असं काही ठरलंच नव्हतं. पण मी शपथ घेऊन सांगतो, भाजप आणि शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचं असं ठरलं होतं. मग त्यावेळी या गद्दारांनी का आवाज उठवला नाही. शिवसेना संपवण्यासाठी आता सर्व काही सुरू आहे. याला आमदार केलं, मंत्री केलं, आताही मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा यांची गद्दारी सुरुच. ही बाप चोरणारी औलाद आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभ्य गृहस्थ आहेत. त्यांना जसा कायदा कळतो तसा आम्हालाही कळतो. मिंधे गटातील कोण गोळीबार करतोय, कोण म्हणतोय चुन चुन के मारूंगा. मग कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते म्हणाले मी पुन्हा येईन. दीड दिवसासाठी ते आले आणि परत गेले. आता उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आहे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही काय कुत्री पाळायची का?

कोंबडी चोरांवरती या मेळाव्यावर बोलायचं नाही, बाप चोरणाऱ्यांवर या मेळाव्यात बोलायचं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. आजचा मेळावा हा विचारांचा मेळावा आहे असं ते म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here