आम्ही या गद्दारांना कधी धडा शिकवतोय अशी जनतेची भावना: उद्धव ठाकरे

0

मुंबई,दि.२१: निवडणुका कधी येतायत आणि आम्ही या गद्दारांना कधी धडा शिकवतोय अशी जनतेची भावना असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी उद्या (दि.२२) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवर जोरदार निशाणा साधला. लोकं निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि आम्ही गद्दारांना धडा एकदा धडा शिकवतोय अशी त्यांची भावना असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

शिवसेना शिंदे वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं? शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य हे उद्याच्या निकालावर अवलंबून असेल. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी या निकालावर भाष्य करत उद्या न्यायालयात जे व्हायचं ते होईल, आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. माझ्यासोबत जनतेच्या भावना जोडल्या असल्याचंही ते म्हणाले.

“त्यांच्याकडे सर्वच काम पैशानं होतायत. माझ्याकडे जीवाला जीव देणारी लोक आहेत. तुम्ही जी काही पत्र घेऊन आलायत हा मी पहिला टप्पा मानतो. न्यायालयात उद्या काय व्हायचं ते होईल. माझ्या न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणुका कधी येतायत आणि आम्ही या गद्दारांना कधी धडा शिकवतोय अशी त्यांची भावना आहे. पण निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात हिंमत आहे असं वाटत नाही,” असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here