udayanraje bhosale: शरद पवार यांच्या निवासस्थानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, छत्रपती उदयनराजेंची शरद पवारांवर जहरी टीका

0

सातारा,दि.९: udayanraje bhosale: छत्रपती उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी शरद पवार (sharad pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी काल (दि.८) हिंसक आंदोलन करत चप्पल फेक केली. या घटनेनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलन प्रकरणी प्रकरणी १०५ आंदोलकांविरोधात कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हिंसक आंदोलना प्रकरणावरून आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावर झालेल्या हिंसक आंदोलनाचं समर्थन केलं आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

कर्म असतं ना कर्म… जे आपण जन्म करतो… प्रत्येकजण मला लागू होतं, तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं… यातून कोण वाचत नाही. जे आपण या जन्मी करतो, ते ह्याच जन्मी आपल्याला कुठल्याना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर जहरी टीका केली.

संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी काल मुंबईतील शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल केला. बराच वेळ तिथे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. पण ही खूप मोठी घटना होती. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि सहआयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केलीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here