मुंबई,दि.8: उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, एक चर्चा सुरु आहे शिवसनेच्या चिन्हाबद्द्ल. कायद्याच्या दृष्टीने बघतिलं तर धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघुन मतदान करतात. नवीन चिन्हांचा विचार करत नाही हे मुद्दामून तुम्हाला सांगत आहे.
प्रत्येक निवडणूक ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊनच आम्ही लढत असतो. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचविण्यासाठी घेतलेला आहे. त्यांनी कधीही शिवसेनेवर टीका केलेली नाही, कधीही धनुष्यबाण स्वत:ला मिळावा म्हणून प्रयत्न केलेले नाहीत. कुठेही निशानी घेण्याचा संबंध जोडण्यात येऊ नये. जनतेमध्ये संभ्रम राहू नये, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर आली आहे.
उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही. काल परवाच्या बैठकीत आम्ही त्यावर बोललो आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेबांच्या कुटुंबावर टीका होऊ नये, एवढा त्यांचा आदर राखला जावा, असे आम्हाला सांगितले होते. आम्ही त्यांना तुमचा एखादा नेता असे बोलतोय हे निश्चित सांगू, असेही उदय सामंत म्हणाले.
मातोश्रीचे दरवाजे उघडल्यावर त्यांनी आदित्य ठाकरे सामान्य शिवसैनिकांना भेटत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. तसेच मंत्री पदावरून मी माझ्या वैयक्तिक कामांत होतो, मुंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि परत मुंबई असा फेरा झाला. माझ्यावर महाराष्ट्राच्या सेवेची एखादी जबाबदारी टाकली तर मी ती निश्चितपणे पार पाडेन असे उदय सामंत म्हणाले.
बैठकीत फडणवीसांनीच सांगितलं
उद्धव ठाकरे आणि ठाकरें कुटुंबीयांवर झालेल्या टीका टिपण्णीचं आजही आम्हाला दुख आहे. आमच्या बैठकीतही आम्ही सांगितलंय, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं आमच्यासमोर भाषण झालं. त्यावेळी, ठाकरे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्यांवर टिका होऊ नये, एवढा आदर त्यांचा राखला पाहिजे हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. एखादा कोण टिका करत असेल तर ही गोष्ट आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू, असेही उदय सामंत यांनी म्हटले.