Udaipur Murder Case: कन्हैयालाल हत्या प्रकरण; आरोपींची न्यायालयाच्या आवारातच धुलाई

0

उदयपूर,दि.2: Udaipur Murder Case: राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Udaipur) नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल Kanhaiya Lal) तेली (40) यांची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी सपासप वार करून त्याचा गळा चिरला.

उदयपूरचा टेलर असलेल्या कन्हैयालालची हत्या करणाऱ्या आरोपींना आज न्यायालयाच्या परिसरातच वकील आणि लोकांकडून मारहाण झाली. त्यासंबंधीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी हा प्रकार घडला.

कन्हैयालाल हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी ही हत्या करण्यात आल्याचं नंतर स्पष्ट झालं. एनआयए आता या प्रकरणाचा तपास करत आहे. आज या आरोपींना सुनावणीसाठी आणण्यात येत असताना त्यांना त्या ठिकाणचे वकील आणि उपस्थित लोकांनी मारहाण केली. पोलिसांनी प्रसंगावधान साधून या चारही आरोपींनी गाडीत बसवलं. या चारही आरोपींना आता 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजस्थानमधील टेलर कन्हैया लाल हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार आहे. या हत्येतील आरोपी असलेल्या दोघांचा एनआयएने चौकशी सुरू केली असून या हत्येमागे दहशतवादी गट कार्यरत आहेत का याचा तपास करण्यात येत आहे.

सोमवारी उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात दोन जणांनी दुकानात घुसून कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून त्याचा खून केला. या घटनेनेतर कन्हैया याचा गळा चिरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यामुळे उदयपूरमधील वातावरण तापलं होत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आदेश येईपर्यंत उदयपूरच्या सात पोलीस ठाण्यांच्या परिसरात तात्काळ संचारबंदी लागू करण्यात आली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here