Lakhimpur Kheri: दोन अल्पवयीन मुलींची बलात्कार करून हत्या

0

लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे दोन दलित अल्पवयीन बहिणींवर नराधमांनी बलात्कार करून नंतर हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

या प्रकरणी भरपाई व न्यायाची मागणी करत मुलींच्या कुटुंबीयांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. राज्य शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिल्याचे सांगण्यात येते. जुनैद आणि सोहेलची या दोन बहिणींशी मैत्री होती. हे दोघे शेजारच्या लालपूर गावचे रहिवासी आहेत.  या दोघी बुधवारी दुपारी त्यांच्यासोबत घराबाहेर पडल्या होत्या, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बुधवारी (दि.15) 15 आणि 17 वर्षांच्या या बहिणींचे मृतदेह गावातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. बलात्कार केल्यानंतर गळा आवळून दोघींची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रहेमान, करीमुद्दीन आणि आरीफ या सहा जणांना अटक केली.

पोलिसांशी झालेल्या चकमकीत जुनेद जखमी झाला. त्याच्याकडून एक मोटरसायकल, गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे लखीमपूरचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले.

आरोपी

सर्व आरोपींना फाशी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि भरपाईची पीडित बहिणींच्या कुटुंबीयांची मागणी आहे.

मुलीच्या आईचा दावा

जुनेद आणि सोहेल यांचे दोन्ही बहिणींशी प्रेमसंबंध होते. दोघींनी लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्यांनी दोघींचा काटा काढायचे ठरवले. साथीदारांच्या मदतीने त्यांनी दोघींनी घरातून फरफटत नेले. यावेळी मुलीच्या आईलाही मारहाण करण्यात आली. शेतात नेऊन दोघींवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर दोघींची हत्या करून मृतदेह झाडाला टांगून ठेवले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here