सोलापूर,दि.२: दिवंगत वीरभद्रेश्वर करबसप्पा बसवंती यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त ३ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, काशीपीठाचे उत्तराधिकारी आणि होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकुर, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, सिध्देश्वर देवस्थानाचे चेअरमन धर्मराज काडादी, आ. प्रणिती शिंदे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यु पवार, प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस शैलश पाटील – चाकुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम जुना बसवंती पुना नाका पार्किंग येथे दि . ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे. आदरांजली कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बसवंती मित्र परिवाराच्या वतीने केले आहे .