नवी दिल्ली,दि.24: भारतात ओमिक्रॉनचे (Omicron) शुक्रवार सकाळपर्यंत 358 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर त्यापैकी 114 जणांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरीयंटने (Omicron Variant) कहर केला आहे. भारतातही ओमिक्रॉन व्हेरीयंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळत आहेत, मात्र आता एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतातील उपचार पद्धती Omicron Variant प्रभावी (Indian treatment method) असल्याची माहिती आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी ओमिक्रॉनबाबत महत्वाची माहिती दिली.
आज आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ओमायक्रॉनबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, ओमायक्रॉनचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील जगभरातील सरासरीपेक्षा कमी आहे. इतर देशातील पॉझिटिव्ह रेट 6% पेक्षा जास्त आहे. भारताचा पॉझिटिव्ह 5.3% आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये भारताचा पॉझिटिव्ह रेट फक्त 0.6% राहिला आहे.
भारतातील उपचार पद्धत प्रभावी
आरोग्य सचिव राजेश भूषण पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि डेल्टा व्हेरियंटच्या वेळी राबवलेल्या उपचार पद्धती ओमायक्रॉनवरदेखील प्रभावी असल्याचे पुरावे आहेत. दरम्यान, केरळ आणि मिझोराममधील प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. म्हणाले की, सध्या देशात 20 जिल्हे आहेत, ज्यात केस पॉझिटिव्ह रेट 5 ते 10% च्या दरम्यान आहे. यापैकी 9 केरळमध्ये आणि 8 जिल्हे मिझोराममध्ये आहेत. देशातील फक्त 2 जिल्ह्यांमध्ये केस पॉझिटिव्ह दर 10% पेक्षा जास्त आहे आणि हे दोन्ही जिल्हे मिझोराममध्ये आहेत.