Train Fire Video: गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये अचानक लागली भीषण आग

0
फोटो: PTI

सोलापूर,दि.18: Train Fire Video: रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अमृतसरहून सहरसा येथे जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये अचानक भीषण आग लागली. भारतीय रेल्वेमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी एक अप्रिय घटना घडली आणि या घटनेची भीतीदायक दृश्य पाहून प्रसंग किती भयावह होता हेसुद्धा लक्षात आलं. रेल्वे क्रमांक 12204 अमृतसर-सहरसा च्या एका डब्यानं पेट घेतला. (Garib Rath Train Fire)

रेल्वेच्या डब्याला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अंबालापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या सरहिंद स्टेशनजवळ ट्रेन येताच ही घटना घडली. एका डब्यातून धूर येत असल्याचं पाहून प्रवाशांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यानंतर सावधगिरी बाळगत ट्रेन लगेचच थांबवली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सकाळी 7:30 च्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांन दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किट झाल्याचं म्हटलं जात आहे.

रेल्वेच्या 19 क्रमांकाच्या डब्याला शॉट सर्किटमुळं ही आग लागली. यावेळी रेल्वेनं अनेक व्यापारी प्रवास करत होते. आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये भीतीसह गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी तातडीनं ट्रेनच्या लोको पायलटनं समयसूचकता दाखवत आपात्कालीन ब्रेकचा वापर करत ही ट्रेन थांबवली आणि रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. द्यानंतर प्रवासी तातडीनं सामानासह रेल्वेतून खाली उतरले, ज्यादरम्यान काही प्रवाशांना गंभीर इजासुद्धा झाली. 

आग नियंत्रणात आल्यानंतर रेल्वेची स्थिती तपासली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नुकसान झालेल्या डब्याची तपासणी केल्यानंतर, ट्रेन लवकरच सहरसा येथे रवाना होईल. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि जीआरपी पथकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here