श्री सिद्धेश्वर मंदिर येथे ट्राय ट्रेनची सफर आज पासून सोलापूरकरांच्या सेवेत

0

सोलापूर,दि.9: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज श्री सिद्धेश्वर मंदिर येथे लहान मुलांनाच्या मनोरंजन साठी ट्राय ट्रेनची सुरवात करण्यात आले आहे. या ट्राय ट्रेनचे उदघाटन आज कोल्हापूरचे माजी आयुक्त मलिनाथ कलशेट्टी आणि सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त पी शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, देवस्थानचे सदस्य राजशेखर येळेकर, उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अॅडवेंचर पार्क, स्ट्रीट बाजार, होम मैदान तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रक व बगीचा विकसित करण्यात आला आहे.

त्याच अनुषंगाने लहान मुलांना या ठिकाणी मनोरंजनासाठी ट्राय ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तिकिटाचे दर मोठया व्यक्तीला 20 रुपये, लहान मुलाना 10 रुपये आकारण्यात येणार आहे. या ट्राय ट्रेन ची सफर आज पासून सोलापूरतील नागरिकांना घेता येणार आहे. यावेळी आयुक्त व मान्यवर यांनी मंदिर परिसरात साकारण्यात येणाऱ्या लाईट अँड साऊंड शो या ठिकाणची पाहाणी केली.

ट्राय ट्रेन ही सकाळी 9:00 ते 11:00 पर्यत व संध्याकाळी 4:00 ते 8:00 पर्यत सुरू राहणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here