Cold Drink मध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्त्याचार

0

पुणे,दि.26: Cold Drink मध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तरुणीवर वर्षभरापासून सुरू होता भयंकर प्रकार. काही दिवसांपासून अल्पवयीन मुली व महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. महिलावरील अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील (pune) एका तरुणीला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित तरुणीनं याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. सचिन बलदेव शर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा पंजाब राज्यातील पटीयाला येथील रहिवासी आहे. आरोपीनं 24 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2021 दरम्यान पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं 24 नोव्हेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची एका मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाली होती. आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिला विविध ठिकाणी घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेला गुंगी येणारं औषध देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला आहे. पीडित तरुणी बेशुद्धावस्थेत असतानाच, आरोपीनं तिला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या हा धक्कादायक प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीनं अखेर पोलिसांत धाव घेतली आहे. पीडितेनं पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here