जळगाव,दि.२६: अल्पवयीन मुलीला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्त्याचार केल्याची घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर गावातीलच तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणााला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची गावातील संशयित साबीर शेख जहूर (वय २६) सोबत ओळख होती. याचा गैरफायदा घेत १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान साबीर शेख याने अल्पवयीन मुलीला त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी शुक्रवारी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित साबीर शेख जहूर याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहेत.