Rajinikanth Birthday : सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस, ही आहे रजनीकांत यांची खासियत

0

सुपरस्टार रजनीकांत यांची एक खासियत म्हणजे जर त्यांचा कोणताही चित्रपट फ्लॉप झाला तर ते त्याची फी निर्मात्याला परत करतात.

Rajinikanth Birthday : सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. रजनीकांतने 1975 साली ‘अपूर्वा रागनगाल’ सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आजही त्यांचे काम इतरांना प्रेरीत करते. सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सच्या यादीत त्याचा समावेश आहे. करोडोंमध्ये फी घेणाऱ्या रजनीकांतकडे खूप आलिशान घरे आहेत.

रजनीकांत यांची खासियत

कॅकनॉलेज या वेबसाईटच्या अहवालानुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती 365 कोटी आहे. आपल्या संपत्ती पैकी बराचसा भाग रजनीकांत दान करतात. रजनीकांत यांची अजून एक खासियत आहे ती म्हणजे जर त्यांचा कोणताही चित्रपट फ्लॉप झाला तर ते त्याची फी निर्मात्याला परत करतात. वेबसाइटनुसार, रजनीकांत एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतात.

भौतिकशास्त्राच्या नियमांना चॅलेन्ज देणारे, गुरूत्वाकर्षणासारखा सर्वमान्य नियमही ज्यांनी आपल्या ॲक्शन सीन मधून खोटा ठरवला. वयाच्या सत्तरीनंतर बॉक्स ऑफिसवर कोट्टयांची उड्डाणे घेणारे रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते जगभरातील सर्वात प्रतिभाशाली आणि लोकप्रिय अभिनेते रजनीकांत हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली अशा विविध भाषेतल्या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला असला तरी त्यांच्या सिनेमा हा भाषिक बंधनात अडकला नाही.

जगभरात रजनीकांत यांचे करोडो फॅन्स आहेत. म्हणूनच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियानं त्यांचा आयकॉन ऑफ ग्लोबल ज्युबिली अवॉर्ड देऊन सन्मान केलाय. सिने क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलंय. नुकत्याच पार पडलेल्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना सिनेक्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलंय. आज ते वयाच्या 72व्या वर्षात प्रवेश करत असले तरी त्यांचा उत्साहपूर्ण दमदार अभिनय पंचविशीतल्या अभिनेत्यांनाही लाजवणारा आहे.

रजनीकांत यांचे चेन्नईमध्ये एक आलिशान घर आहे. हे घर त्यांनी 2002 मध्ये बांधले होते. रजनीकांत यांचे घर खूप आलिशान आहे आणि त्यांनी त्याचे घर प्राचीन वस्तूंनी घर सजवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here