तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी केला भाजपात प्रवेश

0

बीड,दि.11: तिरुमला (Tirumala) उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. महिनाभरापूर्वी तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश कुटे,पत्नी अर्चना कुटे यांचा पक्ष प्रवेश झाला. खाद्यतेल , दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.

उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात भाजपला आणखी बळ मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नाव लौकिक केलं. दिपावली नंतर सुरेश कुटे यांचा हे भाजपामध्ये अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी आजच नागपूर येथे भाजपात पक्ष प्रवेश केला.

‘द कुटे ग्रुप’मुळे बीड जिल्ह्याचाही लौकिक झाला, तसेच हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. महिलांसाठी त्यांनी पत्नी आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं त्यांच्या समूहात खास नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे.

तिरूमला ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी

बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी (Income Tax raid On Tirumala Group) टाकल्या. बुधवारी तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दीडशेहून अधिक आयकर अधिकारी, कर्मचारी बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयात पोचले आणि त्यांनी ही कारवाई सुरू केली. दिवसभर ही कारवाई सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here