विद्यार्थिनीवर सामूहिक अत्त्याचार करणाऱ्या तीन आरोपींना अटक

0

वाराणसी,दि.31: आयआयटी-बीएचयूमधील (IIT-BHU) बीटेकच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी भाजपाच्या आयटी सेलचे पदाधिकारी आहेत. नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती.

ब्रिज एन्क्लेव्ह कॉलनी सुंदरपूर येथील कुणाल पांडे, जीवनाधीपूर बाजारडिहा येथील आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि बाजारदिहा येथील सक्षम पटेल अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही आरोपी भाजप आयटी सेलशी संबंधित आहेत. रविवारी पोलिसांनी त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले आणि तिघांचीही कारागृहात रवानगी केली.

नोव्हेंबरमध्ये आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीला तीन तरुणांनी अडवून तिचा विनयभंग केला आणि व्हिडिओही बनवला. या घटनेच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विद्यार्थी कॅम्पसमध्ये बॅनर, पोस्टर घेऊन निदर्शने करत होते.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही पोलीसांनी जप्त केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी भाजपाशी संबंधित असून अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुणाल पांडे हा भाजपा महानगर युनिटच्या आयटी सेलचा समन्वयक आहे, तर सक्षम पटेल सह-संयोजक आहे. आनंद चौहान हा कँट विधानसभा मतदारसंघातील आयटी सेल समन्वयक आहे.

सामुहिक बलात्कार

लंका पोलीस ठाण्यात दिलेल्या एफआयआरनुसार आयआयटी-बीएचयूमधील विद्यार्थिनी 1 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून फिरायला निघाली होती. ती कॅम्पसमधील गांधी स्मृती वसतिगृह चौकात पोहोचली, तेव्हा तिला तिचा मित्र तिथे दिसला. याचवेळी करमण वीर बाबा मंदिराजवळ मागून बुलेटवर तीन तरुण आले आणि पीडित मुलीसह तिच्या मित्राचा रस्ता अडवला. पीडितेचा मित्र काही वेळाने निघून गेल्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा पीडितेचा रस्ता अडवला आणि गळफास लावून एका कोपऱ्यात नेले. आधी किस केले, नंतर कपडे काढत व्हिडिओ बनवला, फोटो काढले आणि बलात्कार केला. यानंतर पीडितेने आरडाओरडा केल्यावर त्या आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी पिडीतेचा फोन घेतला, 10 ते 15 मिनिटे अडवून ठेवले आणि यानंतर ते पिडीतेला सोडून निघून गेले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here