Threats to Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका?

0

नवी दिल्ली,दि.1 एप्रिल 2022: Threats to Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल द्वारे धमकी देण्यात आली आहे. या बाबत राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. या ई-मेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे 20 किलो आरडीएक्स असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

यापूर्वीही अनेकदा मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा अलर्ट असल्याने हा डाव उधळला गेला. हाती आलेल्या बातमीनुसार, एमआयएच्या मुंबई शाखेला मोदींच्या हत्येचा कट असल्याचं पत्र मिळाले होते. या धमकीवजा मेलमध्ये 20 किलो आयडीएक्सद्वारे मोदींना मारणार असल्याचं धक्कादायक भाष्य केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे एकूण 20 किलो आरडीएक्स (RDX) आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात होता. पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटासंदर्भातील ई-मेलचा स्रोत काय? याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहेत. तसेच, या नापाक इराद्याने दहशतवादी संघटनांनी 20 स्लीपर सेल तयार केल्याचेही, संस्थांचे म्हणणे आहे.

ईमेलनुसार, हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे मेलमध्ये म्हण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा ई-मेल गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनाही पाठवला आहे. या मेलमध्ये 2 कोटी नागरिकांना मारण्याची धमकीही देण्यात आली होती. मात्र हा मेल कुठून पाठवण्यात आला, त्यामागील तथ्य यासर्वांचा तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here