छत्रपती संभाजीनगर,दि.14: शासकीय ठेकेदाराने एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पतीपासून विभक्त झालेल्या पीडिताची आणि आरोपीची ओळख डेटिंग ॲपवर झाली होती. अमोल विठ्ठल पाटील (वय 40 वर्ष, रा. टाऊन सेंटर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर अमोल पाटील याने पीडिताला बायोडाटा घेऊन अॅाफीसला बोलावले.
पीडिता अमोल पाटील यास बायोडाटा घेऊन भेटायला गेल्यानंतर आरोपी पाटील ‘त्याने माझी पत्नी मला सोडून नाशिकला राहते. मी सध्या आई वडील आणि भावासोबत राहतो. तू मला खूप आवडली असून आपण काही दिवसांनंतर लग्न करू असे म्हटला.’
पीडिताने अमोल पाटील याच्याबरोबर लग्नास नकार दिला. पीडितावर पाटीलने अॅाफीसमध्ये बलात्कार केला. तसेच पीडिताचे फोटो आणि व्हिडीओ तयार केले. कोणाला काही सांगितले तर जगू देणार नाही अशी धमकी दिली. त्याच्या धाकाने पीडिताने पोलिसात तक्रार दिली नव्हती.
आरोपी अमोल पाटील पीडितीला अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पाटील तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अखेर महिलेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठून 12 जानेवारीला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.