Raj Thackeray यांच्या या व्हिडिओची होतेय चर्चा, मनसे पदाधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

0

दि.23: Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडिओ (Video) सध्या प्रचंड चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे लोकप्रिय आहेत. राज ठाकरे यांची बोलण्याची, भूमिका मांडण्याची पद्धत अनेकांना आवडते. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी असते. मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात राज ठाकरे यांच्या बद्दल आदरयुक्त भीती आहे. राज ठाकरे यांची पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद साधण्याची एक वेगळी पद्धत आहे. अलीकडे राज ठाकरे यांचं वेगळं रुप सर्वांनाच पाहायला मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचा कार्यकर्त्याला मलम लावतानाचा एक व्हिडीओ (Video) अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी शेअर केलाय. या व्हिडीओ राज ठाकरे चक्क मनसेच्या (MNS) एका कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम लावून देत असल्याचं दिसून आलंय. राज ठाकरे यांच्या मुंबईतील (Mumbai) नव्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान हा किस्सा घडलाय.

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओही जरा हटके आहे. मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि काही पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर गेले होते. याठिकाणी सहज बोलता बोलता मनोज चव्हाण यांनी आज खांदा खूप दुखतोय साहेब असं म्हटलं. त्यावर राज ठाकरेंनी थांब जरा, म्हणत सहकाऱ्याकडून मलम मागवत मनोज चव्हाण यांच्या खांद्यावर स्वत: हाताने ते लावले. हा व्हिडिओ पाहिला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वेगळेच रुप सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळत नाही. यावर अविनाश जाधव यांनी मी राजसाहेबांना दैवत का म्हणतो याची प्रचिती पुन्हा एकदा आल्याचं म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here