ठाकरे गटाचा हा आमदार करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

0

मुंबई,दि.10: ठाकरे गटाचा आणखी एक आमदार उध्दव ठाकरे यांची साथ सोडून हाती धनुष्यबाण घेणार असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना पक्ष व चिन्ह मिळवले. आतापर्यंत अनेक आमदार व खासदारांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या कथित भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे. काही दिवसांआधी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पक्षांतरासाठी रवींद्र वायकर यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप केला होता. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा, असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहुर्त सापडला असून लवकरच ते एकनाथ शिंदेंची साथ देताना दिसणार आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here