यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अंगरक्षकाचे होतेय कौतुक

0

दि.23 : उद्योगपती राज कुंद्रा अश्लील व्हिडिओ प्रकरणात 62 दिवस कारागृहात होता. राज कुंद्राला न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे राज कुंद्रा आपल्या कुटुंबाशी भेटू शकले. यानंतर राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्याच्या मुलाची भेट पाहायला मिळालीच पण त्यासोबतच बॉडीगार्डचं (अंगरक्षक) राज कुंद्रा प्रती असलेलं प्रेम आणि एकनिष्ठा देखील पाहायला मिळाली. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) जेव्हा जुहूतील बंगल्यावर काळ्या रंगाच्या मर्सिडीजमधून पोहोचला. यावेळी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा बॉडीगार्ड रवी अगदी गाडीसमोर जोरात धावताना दिसला. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राज कुंद्राला मीडिया आणि चाहत्यांपासून प्रोटेक्ट करण्यासाठी रवी गाडीसमोर धावताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे.

आपल्या कामावर आणि मालकावर निष्ठा दाखवणाऱ्या अंगरक्षक रवीचं कौतुक होत आहे. कामाप्रती त्यांचे समर्पण पाहून लोक सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करत आहेत. जेव्हा शिल्पा शेट्टीचे वडील मरण पावले तेव्हा रवी संपूर्ण वेळ सुनंदा शेट्टीसोबत उभा राहिली होती. तो त्यांच्या कुटुंबातीलच एक भाग आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here