कथित हॉटेल बिल प्रकरण हॉटेलच्या मालकाबद्दल राजू शेट्टी यांनी दिली ही माहिती

0

मुंबई,दि.18: कथित हॉटेल बिल प्रकरण हॉटेलच्या मालकाबद्दल राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी माहिती दिली आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना हॉटेलमालकाने रस्त्यावर अडवून बिलाचे पैसे मागितल्याची घटना सोलापूर दौऱ्यात घडली. सदाभाऊ खोत कारमधून खाली उतरताच मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना जाब विचारू लागले. 2014 साली लोकसभा निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील मांजरी येथे एका हाॅटेलमध्ये राहिलेले 66 हजार 450 रुपये बिलाचे देण्याचे राहिले असल्यामुळे हाॅटेल मालकाने ताफा अडवला.

राष्ट्रवादी काँग्रेसपासून (NCP) आपल्या जीविताला धोका असल्याचा आरोप सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला आहे. गुरुवारी कथित हॉटेल बिलाच्या थकबाकीवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे राष्ट्रवादीचा लाल टोमॅटोसारखा गाल असलेला नेता आहे असाही आरोप खोत यांनी केला. ताफा अडवून पैसे मागणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत म्हणाले की, ज्या व्यक्तीनं मला अडवले त्याला विचारलं असता, त्या व्यक्तीने 2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान आपले कार्यकर्ते माझ्या हॉटेलात जेवून गेले मात्र अद्याप बिलाची रक्कम चुकती केलेली नाही अशी अस्पष्ट आणि अपुरी माहिती पुरवली. खोलवर विचारणा केली असता सदर व्यक्तीने आपलं नाव अशोक शिनगारे असल्याचं सांगितलं. मात्र ह्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा कोणताही कार्यकर्ता अथवा प्रचारक साधा हॉटेलात चहासुद्धा पित नव्हता कारण आमच्याकडे पैसे नव्हते. मग हजारो रुपयांचं हॉटेलचं बिल होणं अशक्य आहे असं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावला. 

सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. आाता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि सदाभाऊ यांचे जुने सहकारी राजू शेट्टी यांनी संबंधित हॉटेलवाल्याबद्दल माहिती दिली आहे. हॉटेलचालक शिनगारे हे स्वाभिमानीचे कार्यकर्ते होते, असे त्यांनी म्हटलंय. 

सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आम्हाला साथ दिल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे, राजू शेट्टींनी एकप्रकारे या घटनेची पोलखोलची केली आहे. त्यामुळे, आता राजू शेट्टींच्या खुलाशावर सदाभाऊ खोत काय उत्तर देतील, याकडे सर्वांचे लक्षलागले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here