दि.18 : कोरोनाने अनेक देशात थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक देशात नियमावली जाहीर करण्यात आली. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर व हात निरंतर स्वच्छ ठेवणे. कोरोनामुळे अनेकजण मास्कचा वापर करतात. यात काहीजण कापडी मास्क वापरतात. कापडी मास्क धुवून पुन्हा वापरता येतो. मास्कवर अनेक संशोधने करण्यात आली आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करायला सुरूवात केली. परंतु त्यात कोणता मास्क (Which mask is good) वापरावा आणि कोणता वापरू नये, याविषयीची चर्चा सुरू झाली होती. त्यावर अभ्यासही झाले.
कापडी मास्क हा धुवून पुन्हा वापरता येतो. पण असा कपड्याचा मास्क जास्तीत जास्त किती काळ वापरू शकतो यावर संशोधन झालं. त्यामध्ये हा मास्क एका वर्षांहून अधिक काळ टिकू शकतो, असं समोर आलं आहे, कोरोना विषाणूचं संक्रमण कापडी मास्क रोखण्यात यशस्वी ठरतो. इतर मास्कच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण होतं, अशीही माहिती समोर आली आहे.
याबाबत अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील सहायक प्रोफेसर लेखिका मरीना वेन्स यांनी बोलताना म्हटलं आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बातमी आहे. कापडी मास्क वापर झाल्यानंतर तात्काळ धूवूही शकतो, त्यामुळे अशा पद्धतीच्या मास्कचा वापर झाल्यावर त्याला फेकून देण्याचीही गरज नाही.
या संशोधनासाठी अमेरिकेतील लोकांची मास्कबाबत मतं जाणून घेण्यात आली होती. मास्कचा वापर झाल्यानंतर आजूबाजूला फेकून देण्यात येत होतं. अशा या परिस्थितीबाबत आम्ही चिंतीत होतो. कारण असे वापरलेले मास्क फेकणं अधिक धोकादायक, असं मरीना वेन्स यांनी स्पष्ट केलं.
या संशोधनात विविध पद्धतीने बनवलेल्या मास्कचे अध्ययन करण्यात आले होते. असं मरीना वेंस यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे कपड्याचा मास्क हा इतर मास्कच्या तुलनेत चांगला किफायतशीर ठरला आणि अधिक सुरक्षा प्रदान करताना आम्हाला या संशोधनात दिसून आलं असं त्या म्हणाल्या. त्यामुळे आता कोरोनापासून बचाव करताना लोकांना याचा फायदा होणार आहे, त्याचबरोबर सातत्याने मास्क बदलण्याचीही गरज नाही, विशेष म्हणजे यापासून कोरोनावर मात करणे सहज सोपे होईल.