ही ई-कॉमर्स कंपनी देणार 1 लाखांपेक्षा जास्त जणांना नोकरीची संधी

1

दि.24 : कोरोनामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांना कामाची गरज आहे. वाढणारी महागाई बेरोजगारी यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अलीकडच्या काळात अनेकांचा कल ऑनलाईन खरेदीवर आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन नोकरीची संधी घेऊन आली आहे. 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना अ‍ॅमेझॉन नोकरी देणार आहे. ऑनलाईन शॉपिंगची वाढती गरज पाहता अ‍ॅमेझॉन कंपनी 1.10 लाख लोकांना नोकरीची संधी देणार आहे.

भारतात अ‍ॅमेझॉन इंडियाने नोकरीची ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. सणासुदीच्या आधी अ‍ॅमेझॉन भारतात 1,10,000 लोकांना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. देशातील एकूण 35 शहरांमध्ये कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात भरती केली जाणार आहे.

अ‍ॅमेझॉनमध्ये लोकांना पार्ट टाईम आणि फुल टाईम नोकरी करता येणार आहे. कंपनी मुंबईसह देशभरात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. 2025 पर्यंत 10 लाख लोकांना नोकरी उपलब्ध करण्याचे अ‍ॅमेझॉनचं उद्दिष्ट्य आहे.

मुंबई आणि दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई सारख्या या मोठ्या शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकरीचा समावेश आहे. 1,10,000 हून अधिक हंगामी नोकरीची संधी निर्माण झाली आहे.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here