राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.19: राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. आज (दि.19) सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे वाटप करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी सर्वांना घरी रामज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहन केले.

देशातील अनेक राज्यात 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करण्याची मागणी अनेकांनी केली होती. राम मंदिर सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी जाहीर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राज्यात सु्टटी जाहीर करण्याची मागणी केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here