राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या आक्षेपावर दिला हा निर्णय

0

मुंबई,दि.20: काँग्रेसने (Congress) भाजपा आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. परंतु, असे असताना लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. दोन्ही मते बाद करण्यात यावीत अशी मागणी काँग्रेसने केली होती. यावर राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळला आहे. 

विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. परंतू, भाजपाच्या दोन आजारी आमदारांनी त्यांच्या प्रतिनिधीद्वारे मत पत्रिका पेटीत टाकली होती. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यावर राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळला आहे. 

याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मेलद्वारे केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची 15 मिनिटांपासून बैठक सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय घेतला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु होईल. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here