निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.7: निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून घोषीत केले आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली होती.

निवडणूक आयोगाने अजित यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी घोषित केली आहे. सर्व पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. हा निर्णय शरद पवार गटाला मोठा धक्का आहे.

6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणींनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला आहे.

शरद पवार गटाने घेतला हा निर्णय

शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर वकिलांशी चर्चा केली. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासोबत शरद पवारांनी फोनवरून चर्चा केली. आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. आता सुप्रीम कोर्टाची भूमिका काय असेल? त्यावरही बरच काही अवलंबून आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here