राममंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी घेतला हा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.20: राममंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येत 22 जानेवारीला राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. जगभरातील अनेक देशात या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतातही अनेक राज्यात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 22 जानेवारीला दिल्लीत अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीचा प्रस्ताव अरविंद केजरीवाल यांनी पाठवला होता, त्याला दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मंजुरी दिली. अनेक राज्य सरकारांनी या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने दिल्ली सरकार, यूएलबी, स्वायत्त संस्था इत्यादी सर्व कार्यालयांमध्ये 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी असेल. 

याआधी अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात सुटी जाहीर केली आहे. यापैकी महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड आणि पुद्दुचेरी यांनी 22 जानेवारीला संपूर्ण दिवस सरकारी सुट्टी जाहीर केली आहे, तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा आणि हरियाणामध्ये सोमवारी अर्धा दिवस कार्यालये आणि संस्था बंद राहतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here