शेतकऱ्यांना मिळणाऱ्या PM Kisan Yojana च्या रक्कमेत होणार वाढ; आता मिळणार इतके रुपये

0

सोलापूर,दि.10: PM Kisan Yojana: देशाच्या आगामी अर्थसंकल्प 2023 मधून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 2023-24 (Union Budget 2023-24) या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. करदात्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana)

या अर्थसंकल्पाकडून नौकरी करणारे लोक आणि शेतकरी, या दोघांनाही मोठी आशा आहे. यावेळी नौकरी करणाऱ्या लोकांना आयकराच्या बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी येत आहे. यामुळे अर्थमंत्री न‍िर्मला सीतारमण यांच्याकडून करण्यात येणाऱ्या घोषणांकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे. याच बरोबर, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीरही सरकारकडून लोकांना आकर्षित करणारी बरीच आश्वासनेही दिली जाऊ शकतात.

कारण, 2024 मध्ये देशाच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सरकारला या दोन विभागांना खुश करण्यासाठी भूमिका घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार यावेळी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेची रक्कम वाढवण्याची घोषणा अर्थमंत्री करू शकतात.

पीएम किसानची रक्कम किती वाढू शकते? | PM Kisan Yojana

सूत्रांचे म्हणणे आहे, की पीएम किसान सन्मान निधीत (PM Kisan Samman Nidhi Yojana) दर वर्षी मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या रकमेत वाढ केली जाऊ शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सरकार हा निर्णय घेऊ शकते.

3 एवजी 4 वेळा मिळणार पैसे – असे बोलले जात आहे, की या योजनेत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिलेली जाणारी रक्कम आता 4 हप्त्यांमध्ये दिली जाऊ शकते. यानुसार आता दर तिमाहीला शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

सध्या दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग केले जातात. मात्र, हा बदल झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात दर तिमाहीला 2000 रुपये जमा केले जातील. अर्थात, शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये जमा होतील.

पीएम किसानचा हप्ता का वाढू शकतो? | PM Kisan Samman Nidhi Yojana

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट फार पूर्वीच ठेवले होते. त्याचे लक्ष्य 2022 वर्षासाठीही ठेवण्यात आले होते. पण, दरम्यानच्या काळात कोरोना महामारीमुळे देशाला अनेक पैलूंवर विचार करावा लागला. परंतु, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे 12 हप्ते देण्यात आले आहेत. त्याचा तिसरा हप्ता जानेवारी 2023 मध्ये येणार आहे. योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. बी-बियाणे आणि खतांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनाही पैशांची गरज आहे. पीएम किसानमध्ये रक्कम वाढवली तर मोठा दिलासा मिळेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here