महाराष्ट्रातील चित्रपटगृहे यातारखेपासून होणार सुरू

0

दि.25 : कोरोनामुळे महाराष्ट्रातील चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोंबर पासून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राज्यातील चित्रपटगृहे (Cinema Halls) 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी (SOP) तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

येत्या 5 नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो.अनलॉक नंतर अनेक कलाकारांची नाट्यगृह सुरू करण्याची मागणी होती. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शक्यता धुसर होती. पण, आता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे 5 नोव्हेंबरला नाट्यगृह सुरू केले जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here