न्याव्यवस्थेला धमकी देणारं सरकार यालाच हुकूमशाहीचं सरकार म्हणतात: संजय राऊत

0

मुंबई,दि.19: देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांची गुलाम राहावी यासाठी धमकी दिली जात असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. सध्या न्यायव्यवस्था खिश्यात टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू, देशात अजून असे काही न्यायाधीश आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत, मात्र त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांची गुलाम राहावी यासाठी धमकी दिली जात आहे. कायदा मंत्री किरण रिजीजूंचा न्यायालयावर दबाव आहे.

आता कोणीही सभा घेतली तरी फरक पडत नाही

5 मार्चला खेडमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जी सभा झाली त्यामध्ये सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. कोकणातील जनता उद्धव ठाकरेंच्या मागे असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आता कोणीही सभा घेतली तरी फरक पडत नसल्याचे राऊत म्हणाले. आज खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Sinde)यांची जाहीर सभा होत आहे. त्यांच्या या सभेबाबत राऊतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी राऊत बोलत होते.

न्याव्यवस्थेला धमकी देणारं सरकार यालाच हुकूमशाहीचं सरकार म्हणतात

न्याव्यवस्थेला धमकी देणारं सरकार यालाच हुकूमशाहीचं सरकार म्हणतात अशी टीका संजय राऊतांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हुकूमशाही विरोधात लंडनमध्ये आवाज उठवला आहे, म्हणून राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे राऊत म्हणाले. संसदेत जे काम चाचलं आहे, त्याबाबत राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी जर भूमिका मांडली असेल तर त्यांनी माफी का मागावी असा सवाल संजय राऊत यांनी केला. राहुल गांधी यांनी माफी मागण्याचे कोणतेही कारण नसल्याचे राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here