महिला चक्क सिंहाला कडेवर घेऊन पळाली, शॉकिंग Video

Video: सिंहाला कडेवर घेऊन पळताना कधी पाहिले का?

0

सोलापूर,दि.24: महिला चक्क सिंहाला कडेवर घेऊन पळत असल्याचा शॉकिंग Video व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ प्रेरणादायी असतात तर काही मनोरंजन करणारे असतात. काही व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसतो.

आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल क्लिपमध्ये एक महिला चक्क मादी सिंहाला कडेवर घेऊन रस्त्याने पळताना दिसत आहे. यावेळी तो सिंह जोरजोरात डरकाळी फोडताना ऐकू येतोय. 

कुत्र्या-मांजराप्रमाणे सिंहाला आपल्या कडेवर उचलून महिला पळताना पाहून नेटकरही अवाक् झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी एक महिला सिंहाला आपल्या कडेवर घेऊन पळताना दिसत आहे. यावेळी तो सिंह महिलेच्या तावडीतून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पण ती महिला सतत त्याला काही सोडत नाही. काही सेकंदांनंतर सिंह उडी मारतो आणि रस्त्यावर बसतो.

काही सेकंदांच्या या क्लिपने नेटकऱ्यांना विचारात पाडले आहे. कारण असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. हा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर twfeq नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला शेकडो लाईक्स मिळाले आहेत. ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here