सापांसोबत खेळणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ पाहून येईल अंगावर काटा

0

दि.20 : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर (Social Media) सापाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही मजेशीर असतात. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती अनेक सापांच्या मध्ये बसलेला दिसत आहे आणि तो अतिशय आनंदात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी म्हटलं, की या व्यक्तीनं खतरों के खिलाडीमध्ये जायला हवं.

झूकीपर जे ब्रेवर (Zookeeper Jay Brewer) हे अनेकदा वेगवेगळ्या प्राण्यांसोबतचे आपले हैराण करणारे व्हिडिओ शेअर करत असतात. आपले हे व्हिडिओ ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असतात. त्यांचे हे व्हिडिओ त्यांच्या फॅन्सला भरपूर आवडतात. त्यांनी शेअर केलेले काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही थरकाप उडवणारे असतात. सध्या व्हायरल होणाऱ्या त्यांच्या व्हिडिओमध्ये मोठमोठे साप पाहायला मिळतात.

हा व्हिडिओ शेअर करत जे ब्रेवर यांनी लिहिलं, की हे घरी करून पाहू नका, मात्र नेहमीप्रमाणेच तुमच्या सर्वांचे आभार….नेहमी प्राण्यांसोबत मस्ती करत राहा. व्हिडिओमध्ये ते मोठमोठ्या सापांच्या मध्ये बसलेले दिसत आहेत. ब्रेवरनं आपल्या फॉलोअर्सचे आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये हसत हसत ते हे बोलताना दिसतात, की मला नाही माहिती काय सुरू आहे, मात्र मला असं वाटतंय की मी इथे पूर्ण रात्र घालवणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here