बातम्या सुरू असताना वृत्तवाहिनीवर लागला अश्लील व्हिडीओ

0

दि.21: वृत्तवाहिन्या पाहणारा मोठा वर्ग आहे. अनेक वृत्तवाहिन्या ताज्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. अनेक वृत्तवाहिन्यांचे सादरीकरण चांगले असते. अनेकजण ताज्या बातम्या पाहण्याला प्राधान्य देतात. तर, वृत्त वाहिन्यासुद्धा क्षणाक्षणाची माहिती देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दिवसभराच्या बातम्यांमध्ये अनेकदाकाही ताज्या घडामोडींचं थेट प्रक्षेपणही दाखवण्यात येतं. पण, हे थेट प्रकरणएका प्रथितयश वृत्तवाहिनीला थेट अडचणीत आणून गेलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वॉशिंग्टनमधील KREM न्यूज या वाहिनीवर Anchor हवामान वृत्त सांगत असताना तिच्या मागे असणाऱ्या स्क्रीनवर अचानकच अश्लील व्हिडीओ सुरु झाला. तिथे अँकरला याची काहीच कल्पना नसल्यामुळं ती तिचं काम करत हवामान वृत्त देत राहिली होती.

व्हिडिओ पहा

काही सेकंदांसाठी हा व्हिडीओ वृत्तवाहिनीवर दिसत असल्याचं लक्षात येताच लगेचच हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या नकाशाला झूम इन करण्यात आलं. सदर प्रकरणी वाहिनीकडून काही तासांतच दिलगिरी व्यक्त करण्यात आली. शिवाय यापुढे अशी एकही घटना घडणार नाही, अशी हमीही प्रेक्षकांना दिली.

स्पोकेन सिटी पोलीस खात्यानंही हा सर्व प्रकार निंदास्पद असल्याचं सांगत या सर्व प्रकाराची तपासणी होत असल्याचं स्पष्ट केलं. ही सायबर क्राईमची घटना आहे की वृत्तवाहिनीतीलच कोणी हे घडवून आणलं आहे याचा तपास करण्यात येत आहे. पण, अद्यापही याबाबत काहीच माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here