Video: ट्रॅफिक पोलिसाला कार चालकाने बोनेटवरून नेलं फरफरटत

Video Viral | ट्रॅफिक पोलिसाला कार चालकाने बोनेटवरून फरफरटत नेल्याची घटना घडली आहे.

0

इंदूर,दि.१३: Video Viral | ट्रॅफिक पोलिसाला कार चालकाने बोनेटवरून फरफरटत नेल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे. ट्रॅफिक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ट्रॅफिक पोलिसाने कार चालकाला थांबवल्यानंतर त्याने थेट पोलिसाच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने कार चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या चालकाने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच घातली आणि बोनेटवरून त्याला फरफटत नेलं आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कार चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे थांबवलं

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर चौकात ड्युटीवर असताना ट्रॅफिक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल शिव सिंह चौहान यांनी कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला मोबाईलवर बोलत असल्यामुळे थांबवलं आणि दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर बोलत असलेल्या कार चालकाला मी थांबवलं. दंड भरण्यास सांगितले परंतु त्याने पैसे देण्यास नकार दिला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

ट्रॅफिक पोलिसाला कार चालकाने बोनेटवरून नेलं फरफरटत

ट्रॅफिक पोलिसाला नेलं फरफटत

कार चालवणाऱ्या व्यक्तीने वेग वाढवला तेव्हा ट्रॅफिक पोलीस हेडकॉन्स्टेबल चौहान बोनेटवर पडले आणि स्वत: जीव वाचवण्यासाठी त्याने बोनेट पकडून ठेवलं. पण तरीही आरोपी लांबपर्यंत गाडी चालवत राहिला. भरधाव वेगाने कार चालवत असताना आरोपी डावीकडे व उजवीकडे वळवत राहिला जेणेकरून पोलीस कर्मचारी खाली पडेल, मात्र हेड कॉन्स्टेबल शिव सिंह चौहान बोनेटला लटकत राहिले. मागून आणखी पोलीस पोहोचले आणि त्यांनी गाडी थांबवली.

आरोपीवर कायदेशीर कारवाई

पोलिसांनी आरोपीला पकडले असता त्याचे नाव केशव उपाध्याय असल्याचं समोर आलं आहे. याचदरम्यान आरोपीने पोलिसांशी गैरवर्तनही केले आहे. झडतीमध्ये पोलिसांनी एक शस्त्रही जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here