अपघातातील जखमींचा जीव वाचवण्यासाठी सरकारने आणली ही योजना, सहभागींना मिळणार 5000 रुपये

0

दि.5 : दरवर्षी भारतात रस्ते अपघातात लाखोंचे मृत्यू होतात. अनेकांचा वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने मृत्यू होतो. अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल न केल्याने प्राणास मुकावे लागते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातात जखमींना Golden Hour अर्थात अपघात झाल्यापासून एक तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपये बक्षिस म्हणून दिले जाण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना रस्ते अपघातात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी लाँच करण्यात आली आहे. Golden Hour योजना 15 ऑक्टोबर 2021 पासून लागू केली जाईल. मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन सचिवांना योजनेशी संबंधित पत्र पाठवण्यात आलं आहे.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवल्यास, मृतांची आकडेवारी अतिशय कमी होऊ शकते. देशात दरवर्षी जवळपास 1.5 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याच उद्देशाने ही योजना लाँच केली आहे. मंत्रालयाने चांगल्या सहकार्यासाठी मदत पुरस्कार देण्याच्या या योजनेसंबंधी निर्देश जारी केले आहेत. या योजनेचा उद्देश रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवणं हा आहे.

अशा परिस्थितीत मदत करणाऱ्या व्यक्तीला 5 हजारांसह एक प्रमाणपत्रही दिलं जाईल. त्याशिवाय राष्ट्रीय स्तरावर 10 सर्वात चांगल्या मदतनीसांना एक-एक लाख रुपये हा वेगळा पुरस्कार दिला जाईल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेसाठी स्वतंत्र खातं उघडण्याचं आणि त्याचा तपशील मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरुन मंत्रालय संबंधित राज्यांना 500000 रुपये संबंधित राज्यांना जारी केले जाऊ शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here