या बँकांचे जुनं चेकबुक 1 ऑक्टोबरपासून नाही चालणार

0

दि.26 : चेकद्वारे बँकेचे व्यवहार अनेकजण करतात. अनेक मोठे व्यवहार चेकद्वारे केले जातात. अशा व्यववहार करणाऱ्यांसाठी आणि ज्यांच्याकडे चेकबुक आहे अशा लोकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. तुमचं चेकबुक जर जुनं झालं असेल तर ते तातडीनं बदलून घ्यावं लागणार आहे. तुमच्याकडे यासाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक आहेत.

काही बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे त्या बँकेचे आयएफसी कोड बदलले आहेत. देशातील मोठ्या 3 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे चेकबुक आता कामास येणार नाही आहे. जर तुमचे खाते देखील या बँकांमध्ये असेल तर लगेच चेकबुक बदलावे लागणार आहे. या अशा तीन बँका आहेत ज्या नुकत्याच इतर बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. बँकांच्या विलीनीकरणामुळे, खातेधारकांच्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडमधील बदलांमुळे 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग सिस्टिम जुने चेकबुक स्वीकारणार नाही असं सांगितलं जात आहे.

3 बँकेतील ग्राहकांचे चेकबुक 1 ऑक्टोबरपासून आऊटडेटेड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर येत्या 4 दिवसांमध्ये आपलं चेकबुक नवीन घ्या. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 1 ऑक्टोबरपासून अलाहबाद बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचं जुनं चेकबुक चालणार नाही.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँका पंजाब नॅशनल बँकमध्ये विलीन झाल्या आहेत. तिन्ही बँकांनी आपल्या ट्वीटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तिन्ही बँकांचे जुने चेकबुक आणि MICR कोड चालणार आहेत. त्यानंतर मात्र ते इनव्हॅलिड होतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुम्हाला व्यवहार करायचे असतील तर चेकबुक नवीन घ्यावं लागणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here