ACB ने कर्नाटकच्या सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर ‘येथे’ सापडल्या नोटा

0

बेंगलुरू,दि.25: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) कर्नाटकातील पीडब्ल्यूडी सहआयुक्तांच्या (PWD Joint Commissioner) घरावर टाकलेल्या छाप्यादरम्यान, पाईपलाईन खोदून चलनी नोटांचे बंडले जप्त केले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यव्यापी मोहिमेचा भाग म्हणून कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील पीडब्ल्यूडी सहआयुक्त शांता गौडा बिरादार यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शांता गौडा बिरादार यांच्या घरावर छापा टाकून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 लाख रुपये रोख आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले. पीडब्ल्यूडीच्या सहआयुक्तांनी त्यांच्या निवासस्थानी पाईपलाईनमध्ये रोकड लपवून ठेवल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी ही रोकड जप्त करण्यासाठी प्लंबरलाही बोलावले होते.

छाप्याच्या रेकॉर्ड केलेल्या व्हिज्युअल्समध्ये, अधिकारी आणि प्लंबर पाईपचा काही भाग फोडताना आणि त्यातून नोटांचे बंडल काढताना दिसतात. वास्तविक, हे पाईप्स पैसे लपवण्यासाठीच बसवण्यात आले होते. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या देशव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून, 15 अधिकार्‍यांवर 60 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच बंगळुरू विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावरही छापा टाकला होता. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनी नुकतेच सांगितले की, राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. आमचे सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेण्याच्या बाजूने नाही, असे ते म्हणाले होते. कोणी दोषी आढळल्यास त्याला संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार कारवाई करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here