मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने स्वतःचा जीव घातला धोक्यात

0

दि.23 : आई ही आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करते. आईच्या मायेची बराबरी करणे शक्य नाही. आई मुलाचा जीव वाचवण्यासाठी काहीही करू शकते. आई आपल्या मुलांसाठी सतत राबत असते. आपल्या मुलांवर एखादं संकट आल्यासं आई त्याला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आई आणि मुलाच्या नात्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या अनेक घटनाही वारंवार समोर येतात. अशीच एक घटना समोर आली आहे. आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काय करू शकते, हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) दिसतं, की एक महिला आपल्या लहान मुलासोबत भिंतीच्या बाजूला बसली आहे. यादरम्यान तिला जाणवतं, की काहीतरी घटना घडणार आहे. इतक्यात अचानक ही भिंत कोसळू लागते. याच्या विटा महिलेच्या अंगावर पडतात. मात्र, महिला आपल्या मुलाला धक्काही लागू देत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “या जगाला आईची गरज आहे.” हा व्हिडीओ शेअर होताच लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने म्हटलं की खरोखरच आईसारखा धाडसी दुसरा कोणी असू शकत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here