balasaheb thackeray: शिवसेना खासदाराने काश्मिरी पंडितांनी बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानल्याचा व्हिडीओ केला शेअर

0

दि.१४: balasaheb thackeray: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे (Kashmiri Pandit) पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना त्यांचे अश्रू आवरता आलेले नाही.

हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून यात अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि इतर अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे. दरम्यान या चित्रपटामुळे राजकारणाला देखील ऊत आला आहे. त्यामुळे अनेक पक्षांनी या चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रातील सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. तर शिवसेना खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काश्मिरी पंडितांनी व्यक्त केलेल्या भावनांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काश्मिरी पंडीत असलेल्या युवकाने शिक्षणासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचे आभार मानले आहेत.

“काही गोष्टी लोकांच्या समोर आल्या नाहीत. राजकीय भाषेत बोलायचं झालं तर त्या वेळेस कोणतं सरकारच नव्हतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि तेव्हा राज्यपालांकडे कोणता पर्याय नव्हता. आम्हाला जम्मूत स्थलांतरीत करण्याशिवाय पर्यात नव्हता. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आभारी आहोत. त्यांच्यामुळेच आज ९० काश्मिरी पंडीत सुशिक्षित आहेत. इंजिनिअर आहेत. आम्हाला इथे जे काही आरक्षण आहे, त्याचं संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना जातं. त्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात राहणं शक्य झालं”, अशा भावना या व्हिडीओत काश्मिरी पंडीत असलेला विद्यार्थी व्यक्त करताना दिसत आहे.

दुसरीकडे, “जम्मु काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा”, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here