Social Media Viral : सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. बरेचसे व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. इंटरनेटवर लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत. यातील अनेक व्हिडिओ इतके विनोदी असतात की ते पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ (Funny Wedding Video) पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
देशात लग्नसमारंभाला खूप महत्व आहे. लग्नसमारंभासाठी तयारी केली जाते. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतात लग्नसमारंभ एखाद्या सणाप्रमाणेच मोठ्या उत्साहात आणि आनंदाच पार पाडले जातात. यासाठी अनेक महिने आधीपासूनच तयारीही सुरू होते. जेणेकरून लग्नात काहीही कसर राहू नये. मात्र, इतकी तयारी करूनही ऐनवेळी काहीतरी गडबड झाली तर सगळ्यांच्याच आनंदावर पाणी फेरलं जातं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की वरातीदरम्यान घोडा नवरदेवाला घेऊनच पळ काढतो. (Funny Wedding Video)
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Social Media Viral) तुम्ही पाहू शकता की लग्नाच्या वरातीदरम्यान नवरदेव घोड्यावर बसलेला आहे. मात्र इतक्यात शेजारीच एक फटाका वाजतो. फटाक्याचा आवाज ऐकून घोडा घाबरतो. यानंतर लोकांच्या गर्दीतून हा घोडा नवरदेवाला घेऊन वेगात पळून जाते. नवरदेव घोड्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मात्र, घोडा थांबत नाही.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी नवरदेवाची मस्करी केली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही केला आहे. यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. काही लोकांनी नवरदेवासाठी चिंताही व्यक्त केली आहे.