दि.20: अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी एक काळ गाजवलेला आहे. सुनील शेट्टीच्या चित्रपटातील अनेक गाणी त्याकाळी हिट झाली आहेत. सुनील शेट्टीने आपल्या कामाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) बरीच ओळख निर्माण केली आहे. तो पूर्वीसारखा चित्रपटांमध्ये सक्रिय नसला तरी सोशल मीडियावर (social media) त्याचे फॅन फॉलोअर्स (fan followers) प्रचंड आहेत. करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि रवीना टंडनसोबत (Raveena Tandon) सुनील शेट्टीची जोडी चांगलीच जमली होती.
सुनीलने या अभिनेत्रींसोबत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता पुन्हा एक संधी आली आहे, जेव्हा प्रेक्षकांना सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूरची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. सुनील नुकताच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या (India’s Best Dancer) सेटवर पोहोचला, जिथे त्याने स्पर्धक आणि जजसोबत खूप धमाल केली.
सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूरचा हा व्हिडिओ सोनी टीव्हीने (Sony TV) आपल्या ट्विटर व इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.’शहर की लडकी’ गाण्यावर दोन मुलींनी आपल्या नृत्य कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
डान्स पाहून सुनीलनेही ‘हिंदुस्थानी लाडकी’ म्हटले. शोमध्ये सुनील शेट्टीनेही स्टंट दाखवले, जे कौतुकास्पद होते. व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि लिहिले : “90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर जोडपे करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजनवर एकत्र आले. जिथे अण्णांनी स्वतःचा वेगळा स्वभाव दाखवला.”