पैशांचा पाऊस पडतो म्हणून भोंदू बाबाने तरूणाला लावला 18 लाखाचा चुना

0

पुणे,दि.4: पुणे, शिक्षणाचे माहेर घर का जादू टोण्याची नगरी असा प्रश्न अलीकडे पडत आहे. पैशांचा पाऊस पडतो म्हणून पुण्यातील हडपसरमधील एका तरूणांचे मांत्रिकाने तब्बल अठरा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर (Pune Hadapsar) परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक आईरा शॉबने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असं आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत होता. मांत्रिकांची आणि फिर्यादी छोटेलाल परदेशी यांची एका मित्रमार्फत  भोंदू बाबा यांच्याची ओळख झाली. त्याने पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली.

पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलिस आले. त्यांनी बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला हे कळताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे , रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here