Maharashtra Rajya Sabha Election Result: निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही,तर जिंकण्यासाठी लढविली होती: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि.11: Maharashtra Rajya Sabha Election Result: ‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) धनंजय महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर महाराष्ट्रात काल रात्री उशिरा राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. येथील 6 जागांवर झालेल्या निर्णयानुसार महाविकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीला धक्का बसला. या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला.

24 वर्षानंतर राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी प्रत्यक्ष मतदान (Rajya Sabha Election Voting) झाले आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात आज जोरदार चर्चा होती ती राज्यसभा निवडणुकीची. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा निष्फळ ठरली. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून निरनिराळे दावे केले जात होते. विशेषत: सहाव्या जागेवर नेमका कोणता उमेदवार निवडून येणार? याची देखील उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदान न करणे याचाही परिणाम झाला. धनंजय महाडिक यांना 41.58 तर संजय पवार यांना 39.26 मते मिळाली.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’ हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. समोर शरद पवार यांच्यासारखा दिग्गज असतानाही त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.

‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांनी 41.5 मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मतं मिळाली. जे मत बाद झालं, ते मत ग्राह्य धरलं असतं, किंवा मलिकांना मताचा अधिकार दिला असता तरी आमचा उमेदवार निवडून आला असता. यामध्ये ज्या अपक्षांनी आम्हाला मतं दिली त्यांचे आभार. जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात, त्यांना या विजयाने लक्षात आलं असेल की ही जनता म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे ती आता कायम सुरू राहिल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here