दि.27: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. बिबट्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. बिबट्या व कुत्र्याचाही व्हिडिओ पाहिला असेल. बिबट्याने कुत्र्याची शिकार केलेले व्हिडिओ पाहिले असतील पण कुत्र्याने बिबट्याला पळवून लावल्याचे पाहिले नसेल. पुण्यातील आंबेगाव येथे हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा कुत्र्याने पाठलाग केला आणि त्याला आपल्या जबड्यात पकडले. शिकारी बनून आलेला बिबट्या स्वतः कुत्र्याची शिकार झाला. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय.
एका पाळीव कुत्र्याने चक्क बिबट्याला मात देत त्याला पळवून लावले आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओही मोबाईलमध्ये चित्रित झाला असून सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आंबेगावच्या गणेश शेवाळे यांच्या घरातील पाळीव ‘वाघ्याने’ चक्क बिबट्याला स्वतःच्या जबड्यात धरले.
आंबेगावात मागील 15 दिवसांमध्ये दोनवेळा कुत्र्याचा बिबट्यासोबत सामना झाला आणि दोन्हीवेळा त्याने बिबट्याला पळवून लावले आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याला कुत्र्याने 25-30 सेकंद त्याच्या जबड्यात धरले. यादरम्यान जखमी बिबट्याने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली आणि तेथून पळ काढला.