जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान जागेची मोजणी कोर्ट कमिशन करणार

0

सोलापूर,दि.1: जुळे सोलापुरातील नागरिकांसाठी नव्याने होणाऱ्या महात्मा बसवेश्वर उद्यान माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या प्रयत्नातून होत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत करत अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार जागेची मोजणी होणार असून अंतिम आदेश त्याच दिवशी होणार आहेत. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लवकरच बसवेश्वर उद्यान अस्तित्वात येणार असून सुमारे दोन लाख लोकसंख्या असणाऱ्या या भागासाठी लवकरच नवीन ऑक्सीजन पार्क निर्माण होणार आहे. कोर्टाने आपल्या आदेशात दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी महापौर सुशीला आबुटे त्यांचे बंधू अनिल आबूटे, यांच्यासह वानकर बंधूंना मोजणीच्या वेळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कोर्ट कमिशनच्या माध्यमातून मोजणी होणार असल्याने कोणताही वाद-विवाद उद्भवण्याची शक्यता आता कमी झाली आहे आणि जुळे सोलापुरातील तमाम नागरिकांचा प्रतिष्ठेचा व अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे. हा विषय लवकरच महात्मा बसवेश्वर उद्यान या ठिकाणी निर्माण होऊन ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी,महिलांसाठी मोठी सोय निर्माण होणार असल्याची माहिती महात्मा बसवेश्वर स्मारक समिती तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here