कोंबड्याने केली कोंबडीची सुटका, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

0

The Cock And Hen Viral Video कोंबड्याने कोंबडीची सुटका केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

The Cock And Hen Viral Video : कोंबड्याने (Cock) धडपड करत कोंबडीची (Hen) सुटका केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फक्त मानवातच नाही तर पशु पक्षीही आपल्या सहकारी, मित्र, जोडीदारावर अपार प्रेम करतात. संकटात ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावून येतो अगदी तसेच हे पशु पक्षीही मदतीला धावून येतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की अनेकदा प्राणी आणि पक्षीही माणसापेक्षा जास्त समजदारपणा दाखवतात. या व्हिडिओमध्ये कोंबडीला (Hen) वाचवण्यासाठी कोंबडा (Cock) जे काही करतो, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की कोंबडा आपल्या कोंबडीला वाचवण्यासाठी थेट एका युवकासोबतच भिडतो. यादरम्यान कोंबडा असं काही करतो, जे पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या हैराण करणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडा या युवकाच्या तावडीतून कोंबडीची सुटका करण्यात यशस्वीही होतो. व्हिडिओ पाहून लोक कोंबड्याची हिंमत आणि कोंबडीवर असणारं त्याचं प्रेम, याचं कौतुक करत आहेत.

व्हिडिओची सुरुवात एका हॉलपासून होते. यात कोंबडा आणि कोंबडी एकसोबत फिरताना दिसतात. इतक्यात इथे एक व्यक्ती येतो आणि तो कोंबडीला उचलून आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून कोंबडा भडकतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडा आपल्या चोचीने या व्यक्तीवर हल्ला करू लागतो. मात्र यावेळी कोंबडीला वाचवण्यात तो अपयशी ठरतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो व्यक्ती कोंबडीला पकडून एका छोट्या जाळीत बंद करतो. यानंतर मात्र कोंबडा जे काही करतो, ते हैराण करणारं आहे. कोंबडा वरती चढून आपल्या चोचीने याचा दरवाजा उघडतो. यानंतर लगेचच कोंबडी बाहेर येते. हा व्हिडिओ IPS ऑफिसर रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी खास मेसेजही लिहिला आहे. ‘जब कोई बात बिगड़ जाए, तुम देना साथ मेरा’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओ दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here