नवी दिल्ली,दि.13: भारतात व्हीएलसी मीडिया प्लेअर ॲपवर (VLC Media Player App Ban) बंदी घालण्यात आली आहे.केंद्र सरकार वेळोवेळी धोकादायक ॲपवर बंदी घालत असते. भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच भारत सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. सुरक्षतेच्या कारणास्तव सरकारने हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारकडून VLC Media Player ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. हे ॲप युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप होत होता, असं काही मीडिया रिपोर्टमध्ये बोललं जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने या ॲपवर बंदी आणली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि अपल प्ले स्टोअर सारख्या साईटवरून हटवण्यात आलं आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने आयटी कायदा 2000 अंतर्गत VLC मीडिया प्लेयर आणि VideoLAN प्रोजेक्टच्या वेबसाइटवर बंदी घातली आहे. VLC मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण VLC प्लेअरची वेबसाइट डाउन आहे आणि डाउनलोड लिंक देखील ब्लॉक करण्यात आल्या आहेत. व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईट ओपन केल्यावर आय ॲक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.
VLC Media Player हे VideoLAN प्रोजेक्ट अंतर्गत फ्रान्समध्ये तयार करण्यात आलेलं ॲप आहे. भारत सरकारने या ॲपवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे ॲप आता भारतात वापरता येणार नाही. VLC Media Player एसीटी फायबरनेट, व्हीआय (VI – Vodafone Idea) यासारख्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांवरूनही हटवण्यात आलं आहे. याआधी भारत सरकारने चीनी ॲपवर बंदी घातली होती. मात्र VLC Media Player चायनीय अप नाही, हे फ्रान्समध्ये तयार करण्यात आलं आहे.
भारत सरकारने याआधीच चीनचे अनेक ॲप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. टिकटॉकसह यूसी ब्राऊजर, शेअर इट इत्यादी ॲप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे चीनी ॲप्स युजर्सचा डेटा चोरी करून विकत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर भारत सरकारकडून अनेक चीनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली.