जितेंद्र आव्हाडांविरोधात वातावरण तापलं, युवामोर्चा आक्रमक

0

धाराशिव,दि.30: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन केले. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपा-युवा मोर्चा-एस सी मोर्चा चांगलाच आक्रमक झाला आहे व निषेध करत हा मुद्दा जोरदार निदर्शन करत आहे.

धाराशिव शहरात निदर्शने

कालच्या या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील वातावरण खूपच तापलं असून भाजपने तर आव्हांडाविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. भाजप, युवामोर्चाचे नेते, कार्यकर्ते यांच्याकडून राज्यातील विविध शहरांत आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, निषेधाच्या घोषणाही देण्यात येत आहेत. धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

आंदोलक जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. भाजपच्यावतीने डॉ. बाबासाहेब चौकात निदर्शने करण्यात आली. चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले. तसेच त्या ठिकाणीच आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना हाकलून काढण्याची मागणी करत कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले.

तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी आव्हाड यांच्यावर टिका करत आव्हाड हे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने चुकीचे विधाने करत असून महाराष्ट्राला अशोभनीय कृत्य करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात असे विचार महाराष्ट्राच्या एकजुटीला घातक असून जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी किसान मोर्चा प्रदेश सचिव रामदास कोळगे, प्र. का. सदस्य प्रवीण पाठक, प्रदेश उपाध्यक्ष महिला अस्मिता कांबळे, जिल्हाउपाध्यक्ष सुनील काकडे, सरचिटणीस इंद्रजित देवकते शहर अध्यक्ष अभय इंगळे, सिधोजी राजेनिंबाळकर, एस सी मोर्चा अध्यक्ष अमोल पेठे, नरेन वाघमारे, अजित खापरे,विद्या माने, गणेश मोरे, रंजित देशमुख, अभिजीत काकडे, अमोल राजेनिंबाळकर, नाना कदम ,दाजी आप्पा पवार, शेषेराव उंबरे ,रोहीत देशमुख, प्रमोद बचाटे, प्रसाद मुंडे ,सुनिल पंगुडवाले, प्रवीण सिरसाठे, मेसा जानराव, सागर दंडनाईक, किशोर पवार, उदय बनसोडे, आनंद भालेराव, पुष्पकांत माळाळे, जे के अतुल कावरे, दादा पवार, अरुण पेठे, संग्राम बनसोडे, नानासाहेब पाटील, शिवानी परदेशी, नवनाथ सोकर, सार्थक पाटील, कृष्णा उंबरे, प्रमोद हावळे ,यांच्यासह मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here