परमबीर सिंह यांच्यावर दहशतवादी अजमल कसाब संदर्भात माजी एसीपीने केला हा आरोप

0

मुंबई,दि.25: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली. मात्र अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह फरार झाले होते. परमबीर सिंह यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत, त्यानंतर परमबीर सिंह फरार झाले होते.

अनेक आरोप लागल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. अनेक आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांतील निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल फोन गायब/लपवून ठेवल्याचा आरोप केला आहे.

निवृत्त एसीपी शमशेर खान-पठाण यांनी मुंबईच्या सीपींना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. पठाण यांनी पत्रात लिहिले आहे की, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाईल फोन सापडल्याचे सांगितले होते, जो पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता.

पण, गिरगाव चौपाटीच्या ज्या सिग्नलवर कसाबला पकडले होते, त्या ठिकाणी परमबीर सिंह आले होते आणि त्यांनी तो मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला. पण, त्यांनी तो फोन तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता. या मोबाईलवरुन हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅंडलरशी संवाद साधत होते. त्याफोनद्वारे पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कोणी भारतीय आहे का, हे कळू शकले असते. आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, असं पठाण यांनी म्हटलं आहे. 

परमबीर सिंह चंदिगढमध्ये

परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा अखेर समजला आहे. सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंग समोर येतील अशी शक्यता होती. मात्र अद्यापपर्यंत ते समोर आलेले नाहीत. मात्र त्यांनी स्वत:चा ठावठिकाणा सांगितला आहे. आपण चंदिगढमध्ये असून तपासाला सहकार्य करण्यासाठी लवकरच मुंबईला जाऊ, अशी माहिती सिंग यांनी दिली आहे. मुंबई, ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. मार्च महिन्यापासून सिंह यांचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नाही. ते देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सिंह यांच्या वकिलांना त्यांचा ठावठिकाणा विचारला. त्यावर सिंह देशाबाहेर पळून गेले नसून ते देशातच असल्याचं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here